नवी दिल्ली - चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान आज रवाना होणार आहेत. ४२३ आसनक्षमता असणारे 'जम्बो बी ७४७' हे विमान दिल्लीहून निघून चीनच्या वुहान शहरात उतरेल, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.
-
Air India special flight to depart today from Delhi for Wuhan (China) for the evacuation of Indians. According to Ashwani Lohani, Air India, CMD, at least 400 Indians will be evacuated today. The flight will take off at 12 pm and will return by 2 am tomorrow. #Coronavirus pic.twitter.com/oPtGU9ySAC
— ANI (@ANI) January 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Air India special flight to depart today from Delhi for Wuhan (China) for the evacuation of Indians. According to Ashwani Lohani, Air India, CMD, at least 400 Indians will be evacuated today. The flight will take off at 12 pm and will return by 2 am tomorrow. #Coronavirus pic.twitter.com/oPtGU9ySAC
— ANI (@ANI) January 31, 2020Air India special flight to depart today from Delhi for Wuhan (China) for the evacuation of Indians. According to Ashwani Lohani, Air India, CMD, at least 400 Indians will be evacuated today. The flight will take off at 12 pm and will return by 2 am tomorrow. #Coronavirus pic.twitter.com/oPtGU9ySAC
— ANI (@ANI) January 31, 2020
सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर, आज एअर इंडियाचे विमान आज दुपारी १२.३० वाजता चीनला रवाना होणार आहे. मुंबईहून आज सकाळीच हे विमान दिल्लीला पोहोचले आहे. आज दुपारी निघालेले हे विमान उद्या पहाटे दोनच्या दरम्यान भारतात परत येईल. यावेळी कमीत कमी ४०० नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या विमानात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह पाच डॉक्टरांचे एक विशेष पथकदेखील असणार आहे.
या विषाणूमुळे चीनमध्ये तब्बल २१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल दहा हजारांच्या आसपास लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. जगभरातील देश आपापल्या नागरिकांना चीनमधून परत मायदेशी आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : 'कोरोना'चा कहर : चीनमधील बळींची संख्या २१३, तब्बल १० हजार नागरिकांना संसर्ग..