ETV Bharat / bharat

एअर इंडिया वैमानिक संघटनेचे नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र....सुरक्षेसंदर्भात बैठक घेण्याची मागणी

इंडियन कमर्शियल फ्लाईट असोशिएशन आणि इंडियन पायलट गिल्ड या दोन संघनटांनी पत्र लिहले आहे. कोझिकोड विमान अपघाताचा दाखला या पत्रात देण्यात आला आहे. फ्लाईट सेफ्टीवर आणि वैमानिकांच्या परिस्थितीवर दुर्लक्ष करता येणार नाही, असे पत्रात म्हटले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 13, 2020, 10:59 PM IST

नवी दिल्ली - केरळमधील कोझिकोड विमान अपघातानंतर विमान प्रवास सुरक्षेवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. एअर इंडिया वैमानिक संघटनेने नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांना सुरक्षेसंदर्भात तत्काळ बैठक बोलवण्याची मागणी करणारे पत्र लिहले आहे. एअर इंडिया आणि तिच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांमधील वैमानिकांच्या कामाच्या परिस्थितीवर आणि फ्लाईट सेफ्टीवर (विमान सुरक्षा) संघनटेने लक्ष वेधले आहे.

इंडियन कमर्शियल फ्लाईट असोशिएशन आणि इंडियन पायलट गिल्ड या दोन संघनटांनी पत्र लिहले आहे. कोझिकोड विमान अपघाताचा दाखला या पत्रात देण्यात आला आहे. फ्लाईट सेफ्टीवर आणि वैमानिकांच्या परिस्थितीवर दुर्लक्ष करता येणार नाही, असे पत्रात म्हटले आहे. कोझिकोड विमान अपघातात १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे. सुरक्षा व्यवस्थेतील विविध बदलही संघटनेने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत.

कोरोना संकटात आघाडीवर लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीचा मुद्दाही संघटनेने उचलून धरला आहे. याआधी संघटनेने २७ जुलै आणि १ ऑगस्टलाही पत्र लिहले होते. वैमानिकांच्या अडचणी संदर्भात तातडीने बैठक घेण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करता येणार नाही, असेही पत्रात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.