जयपूर (राजस्थान) - अलवर जिल्ह्यातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीची एका तरुणासह सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तिला गुरुग्राम येथे बोलावले होते. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलवर जिल्ह्यातील एका मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाशी मैत्री झाली. त्यानंतर त्या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवत गुरुग्राम येथे बोलावले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता त्याने त्या मुलीला घेत भिवडी येथे गेल्या. त्या ठिकाणी संशयीत तरुणाच्या मित्रांनीही त्या पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर तो पीडितेला गुरुग्राम येथे सोडूत पळून गेला.
या प्रकरणी भिवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भिवाडीचे पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा - झारखंड : पाचवीतील मुलीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार, सर्व आरोपींना अटक