ETV Bharat / bharat

यमुना द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 4 ठार, 1 जखमी - ग्रेटर नोएडा रस्ते अपघात न्यूज

ग्रेटर नोएडा यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात एका चारचाकीमधील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान कारचे छप्पर आणि दरवाजा कापून जखमी व मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. गाडीमधील लोक लग्नसमारंभाला गेले होते. ते घरी जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत मूळचे आग्रा, हरियाणा, महाराष्ट्र आणि गाझियाबाद येथील आहेत. तर, जखमी फरीदाबादचा रहिवासी असल्याचे समजले आहे.

यमुना द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
यमुना द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
author img

By

Published : Nov 28, 2020, 5:50 PM IST

नवी दिल्ली / नोएडा - ग्रेटर नोएडा यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात एका चारचाकीमधील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान कारचे छप्पर आणि दरवाजा कापून जखमी व मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह आणि जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.

या अपघातात जखमी झालेल्यांपैकी चार जणांना उपचारांसाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गाडीमधील लोक लग्नसमारंभाला गेले होते. ते घरी जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर बीटा -2 कोतवाली परिसरातील यमुना एक्स्प्रेस वे झिरो पॉईंटजवळ गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने ही घटना घडली.

हेही वाचा - लव्ह जिहाद : योगींच्या राज्यात बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा 2020' लागू

यमुना द्रुतगती महामार्गावरील अपघातात 4 ठार तर 1 जखमी

आज सकाळी ठाणे बीटा -2 परिसरातील आग्र्याहून नोएडाकडे येणाऱ्या लेन महामार्गावरील एचपी पेट्रोल पंपाजवळील झिरो पॉईंटच्या जवळपास दीड किलोमीटरच्या आधी चारचाकीने रोडवेज बसला मागून धडक दिली. यातील 5 पैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी बीटा -२ पोलीस ठाण्यातर्फे रुग्णालयात दाखल केले आहे. येथे मृतांचा पंचनामा तसेच, शवविच्छेदन करण्यात आले. आशिष चौहान, आलोक कुमार गुप्ता, मणिगंदन मायकन देवकर, फिरोज अशी मृतांची नावे आहेत. तर, प्रिन्स पॉल असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

झोन तृतीयचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी पाच जण एका चारचाकीने आग्र्याहून नोएडा येथे येत होते. ते एका इव्हेंट कंपनीत कामाला होते. ते आग्रा येथे झालेल्या कार्यक्रमात भाग घेऊन घरी परतत होते. मृत मूळचे आग्रा, हरियाणा, महाराष्ट्र आणि गाझियाबाद येथील आहेत. तर, जखमी फरीदाबादचा रहिवासी असल्याचे समजले आहे.

हेही वाचा - आंदोलन करत रस्त्यावर उतरलेले लोक शेतकरी नव्हेत, भाजप नेत्याची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.