ETV Bharat / bharat

बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी मदुराईतील व्यक्तीने बनवलं नाविन्यपूर्ण मशिन - borewell incident

बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकांना बाहेर काढण्यासाठी यामध्ये 'अंम्बरेला टेक्निक' वापरुन एक मशिन तयार करण्यात आले. त्याद्वारे मुलांना अलगद आहेर काढता येणार आहे.

प्रात्यक्षिक सादर करताना
author img

By

Published : Nov 8, 2019, 3:07 PM IST

तमिळनाडू - जमिनीमध्ये खोदण्यात आलेल्या बोअरवेलमध्ये लहान मुलं पडण्याच्या अनेक घटना देशभरामध्ये घडतात. यामध्ये अनेक बालकांचा मृत्यूही झाला आहे, तर काहींना अथक प्रयत्नांनतर बाहेर काढण्यात आले आहे. बोअरवेलचा खड्डा खोदण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येतो. मात्र, मदुराई येथील एका व्यक्तीने आता बोअरवेलमध्ये पडलेल्या लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी एक सोप्पे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

  • Tamil Nadu: Abdul Razzaq, from Madurai has invented a machine that can be used to rescue children falling into borewell, says,"After the recent borewell incident in Trichy, I decided to invent this machine. In it umbrella technique is used to lift the child from borewell." pic.twitter.com/Tcc0x58oI4

    — ANI (@ANI) November 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
अब्दुल रज्जाक असे हा अविष्कार साकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकांना बाहेर काढण्यासाठी यामध्ये 'अंम्बरेला टेक्निक' वापरुन एक मशिन तयार करण्यात आले.

नुकतेच तमिळनाडुतील तिरची येथे लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी काहीतरी तंत्रज्ञान विकसीत करण्याचा निर्णय घेतल्याचे अब्दुल रज्जाकने सांगितले.

लहानमुले खेळत असताना अनावधानाने बोअरवेलमध्ये पडण्याच्या अनेक घटना घडतात. अब्दुल रज्जाकने बनवलेले मशिन जर मुलांना बाहेर काढण्यात यशस्वी ठरले तर अनेक मुलांचे प्राण वाचतील हे नक्की.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.