नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. 'आम आदमी पक्ष लोकांना हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
भाजप प्रदेशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच प्रयत्न करत आहे. तर आप पक्षाचे नेते सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत, असे तिवारी म्हणाले.
काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने शाहीन बागला पाठींबा दिला आहे. शाहीन बागमध्ये पंतप्रधानांना गोळी घाला, अमित शाह यांना गोळी घाला असे नारे तिथे दिले जात आहेत. या निवडणुकीमध्ये दिल्लीकर निर्णय घेतील, असे तिवारी म्हणाले. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप 50 हून अधिक जागांसह विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान तिवारी यांनी भाजपच्या जाहिरनाम्याचे कौतूक केले. पक्षाने दिल्लीतील लोकांसाठी जाहीर केलेल्या सर्व कल्याणकारी आणि विकास योजना लागू करणार आहे. तसेच जाहिरनाम्यात महिला आणि मुलींना विशेष पसंती देण्यात आल्याचे ते म्हणाले. पक्षाने दिल्लीतील लोकांसाठी जाहीर केलेल्या सर्व कल्याणकारी आणि विकास योजनांचे तपशीलवार वर्णन केले असून यामध्ये महिला आणि मुलींना विशेष पसंती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.