नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनामुळे देशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम आदमी पक्षाच्या आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. करोल बागमधील आमदार विशेष रवी यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे.
विशेष रवी यांच्यासह त्यांच्या भावालाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. दरम्यान त्यांची चाचणी पॉझिटिव्ह जरी आली असली तरी, त्यांना कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नाहीत. त्यांनी स्वत:ला आपल्या घरातच क्वारंटाईन केले आहे.
सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत.