हैदराबाद - राज्यपाल ई.एस.एल नरसिम्हण यांनी राज भवन, हैदराबाद येथे आज (शनिवार) इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची प्रमुख उपस्थिती होती. इफ्तार पार्टीत दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना गोड पदार्थ भरवले. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी प्रार्थनाही केली. दोघांनी एकमेकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
आंध्रप्रदेश येथे झालेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने चांगली कामगिरी करताना १७५ पैकी १५१ जागांवार विजय मिळवला होता. तर, लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पक्षाचा दारुण पराभव केला होता. गुरुवारी जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.