नवी दिल्ली - राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (गुरुवार) शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथे हा सोहळा होणार आहे. या शपथविधीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीत सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांना या सोहळ्याचे आमंत्रण दिले.
शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्याला देशभरातून विविध मान्यवर येणार आहेत. या सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही उपस्थिती दर्शवावी अशी विनंती शिवसेनेने केली आहे.
महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्री पद तर, काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार आहे.