ETV Bharat / bharat

नंदादेवीवरील संभाव्य किरणोत्सर्गाच्या भीतीतून एसआयएफच्या गुप्तचराने सीआयएला केली मदत - स्पेशल फ्रंटियर फोर्सेस न्यूज

1964 मध्ये चीनने झिनजियांग प्रांतात अणुबॉम्बचा चाचणी-स्फोट करून पाश्चिमात्य जगताला आश्चर्यचकित करून सोडले होते. तोपर्यंत पाश्चिमात्य देशांना चीन अणु तंत्रज्ञान मिळवण्यापासून फार दूर आहे, असा विश्वास होता. यानंतर चीनकडून आणखी काही आण्विक चाचण्या केल्या जातात का, हे शोधून काढण्यासाठी सीआयएच्या प्रेरणेतून आलेली नंदादेवी शिखराजवळ 7 हजार 816 मीटर उंचीवर मॉनिटरिंग डिव्हाइस (एखादे उपकरण शोधून काढणारे यंत्र) लावण्याची मोहीम राबवण्यात आली.

नंदा देवी शिखर
नंदा देवी शिखर
author img

By

Published : Sep 6, 2020, 7:42 PM IST

नवी दिल्ली - स्पेशल फ्रंटियर फोर्सेस (एसएफएफ) किंवा ‘एस्टॅब्लिशमेंट-22’ हे भारतातील सर्वांत चांगले रहस्य आहे. पण एसएफएफवरील गुप्ततेचा पडदा हळूहळू उचलला जात आहे. याला कारण आहे, चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी - अ‌ॅक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल) ऑगस्ट 29-30 दरम्यान झालेल्या एका विशेष कारवाईतील एका एसएफएफ अधिकाऱ्याच्या मृत्यूचे.

चिनी सीमेजवळ विशेष कमांडो ऑपरेशन्स घडवून आणण्यासाठी 1962 मध्ये एसएसएफची स्थापना करण्यात आली. उत्तराखंडमधील चक्रता येथे एसएफएफचे मुख्यालय आहे. उंच भूभागावरील युद्धातील तज्ज्ञ कमांडोंचे दल म्हणून याची ओळख आहे. याचा भारताच्या अनेक सैन्य आणि अंतर्गत सुरक्षा संघर्षांमध्ये सक्रिय सहभाग होता. अनेक 'टॉप सीक्रेट ऑपरेशन्स' त्यांनी बिनबोभाट पार पाडली आहेत. परंतु, त्यांचे कार्य लोकांच्या नजरेतून आतापर्यंत सुटले आहे.

अशाच प्रकारची महत्त्वाकांक्षी कारवाई सीआयएला सोबत घेऊन करण्यात आली. यामध्ये कांचनजंगाच्या नंतर भारतातील दुसर्‍या क्रमांकाची उंची असलेल्या नंदादेवी शिखरावर 7 हजार 816 मीटर उंचावरील ठिकाणी मॉनिटरिंग डिव्हाइस लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

1964 मध्ये चीनने झिनजियांग प्रांतात अणुबॉम्बचा चाचणी-स्फोट करून पाश्चिमात्य जगताला आश्चर्यचकित करून सोडले होते. तोपर्यंत पाश्चिमात्य देशांना चीन अणु तंत्रज्ञान मिळवण्यापासून फार दूर आहे, असा विश्वास होता. यानंतर चीनकडून आणखी काही आण्विक चाचण्या केल्या जातात का, हे शोधून काढण्यासाठी सीआयएच्या प्रेरणेतून आलेली नंदादेवी शिखराजवळ मॉनिटरिंग डिव्हाइस (एखादे उपकरण शोधून काढणारे यंत्र) लावण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर इंटेलिजेंस ब्युरोने (आयबी) (एसएफएफने या संस्थेच्या अंतर्गत कार्य करत होती) दिग्गज पर्वतारोही कॅप्टन एम एस कोहली यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन केले.

हेही वाचा - केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या आईचे निधन ; एम्समध्ये केलं नेत्रदान

'मी आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) मध्ये होतो. मात्र, माझ्या सेवांचा वापर आयबीसह इतर समकक्ष संघटनांकडूनही केला जात होता,' असे कॅप्टन कोहली यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. सध्या 89 वर्षांचे आहेत.

'आमचे पथक खूप मोठे होते. त्यात अमेरिकन लोकांचाही समावेश होता. पण मुख्य नेते म्हणजे मी, सोनम ग्यात्सो, हरीश रावत, जीएस पांगू, सोनम वांग्याळ असे होतो. बरेच लोक एसएफएफ किंवा एस्टॅब्लिशमेंट -22 मधील नव्याने सुरू झालेल्या संस्थेतील होते.' पथकातील बर्‍याच सदस्यांना अलास्काच्या माउंट मॅककिन्ली येथे सीआयए सुविधात प्रशिक्षण देण्यात आले होते.

'ऑक्टोबर 1965 मध्ये पहिल्यांदा गिर्यारोहण करताना आम्ही गिर्यारोहक फक्त कॅम्प 4 वर पोहोचू शकलो, जे नंदादेवी शिखराच्या साधारण 150-200 फूट खाली होते. खराब हवामानामुळे आम्हाला मोहीम मध्येच अर्धवट सोडून परत येणे भाग पडले. परंतु, आम्ही हे उपकरण एका छोट्या गुहेत लपवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून, जेव्हा आमची पुढील मोहीम आखली जाईल, तेव्हा आम्ही ते परत मिळवू शकू. परंतु 1966 मध्ये जेव्हा आमची टीम पुन्हा घटनास्थळी पोहोचली, तेव्हा ते उपकरण हरवलेले होते,' असे कॅप्टन कोहली म्हणाले.

'आम्हाला ते उपकरण कुठल्याही परिस्थितीत शोधावेच लागेल, असे अमेरिकन लोकांनी म्हटले. कारण, त्यात किरणोत्सारी कॅप्सूल आहे आणि त्यामुळे अनेक जीव धोक्यात येऊ शकतील. पुढील तीन वर्षे ही शोधमोहीम सुरू होती.' मुळात, चिनी टेस्ट साइटवरून डेटा संकलित करण्यासाठी डिव्हाइसमध्ये सेन्सर आणि सहा फूट उंच अ‍ॅन्टेना होता.

हेही वाचा - चिंताजनक... कोविड रुग्ण संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, ब्राझीलपेक्षाही जास्त बाधित

सेन्सरला जनरेटरद्वारे चालवले जात होते. हा जनरेटर किरणोत्सर्गी उष्णतेचे विजेमध्ये रूपांतर करत होता. जनरेटरच्या मुख्य गाभ्यात प्लूटोनियम इंधन कॅप्सूल ठेवलेली होती. सेन्सरला उर्जा देण्यासाठी जनरेटरमध्ये अंदाजे पाच किलोग्रॅम प्लूटोनियम 238 आणि 239 यात साठवले गेले होते.

अनेकांना असे वाटत होते की, प्लूटोनियम इंधन कॅप्सूलमधून उष्णता बाहेर फेकली जात असल्याने उबदारपणा निर्माण होऊन बर्फ वितळले असावे आणि त्या पाण्यातून किरणोत्सारी मूलद्रव्य आणि ते उपकरण वाहून गेले असावे. मात्र, अमेरिकन लोकांना मात्र, भारतीय पथकाने गुप्तपणे हे उपकरण गुप्तपणे परस्पर लांबवले असावे, असे वाटत होते.

'1965 ते 1968 च्या काळात तीन वर्षे हरवलेल्या जनरेटरचा शोध घेणे ही माझी सर्वाधिक लक्षात राहिलेली आठवण आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. आमच्याकडे श्री. कपूर (मला त्याचे पूर्ण नाव आठवत नाही) नावाचे एक शास्त्रज्ञ होते. आम्ही 1966 नंतर प्रत्येक दिवस ऋषी गंगा नदीचे पाणी तपासण्यात घालवला. त्यामध्ये किरणोत्सारी मूलद्रव्य आढळते का, हे आम्हाला पहायचे होते. ऋषी गंगेला हिमनदी मिळते. या कारणाने रोज किरणोत्सर्गाची पातळी तपासली जात होती,' असे कॅप्टन कोहली म्हणाले.

'अखेर 1967 मध्ये अमेरिकेने तसले दुसरे एक उपकरण आणले आणि आम्ही दुसरी मोहीम राबवून ते नंदा देवी शिखराच्या घुमटाच्या खाली ठेवले,' असे पर्वतारोहक कोहली म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.