विजयवाडा - एका नराधमाने स्व:ताच्या पत्नीचे शीर धडापासून वेगळे करून तिची हत्या केल्याची थरारक घटना रविवारी दुपारी घडली आहे. या हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलिसांसमोर हजर झाला आहे. शहरातील सत्यनारायणपुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
या हत्येनंतर नराधम पती पत्नीचे कापलेले शीर घेऊन रस्त्यावर फिरत होता. त्यावेळी हे थरारक दृश्य पाहून स्थानिकांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर आरोपीने ते शीर जवळच्याच नाल्यात फेकले. त्यानंतर पोलीस स्टेशन गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खटला दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
2010 दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र सतत होत असलेल्या भांडणाला कंटाळून पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाचा निर्णय पतीला मान्य नसल्यामुळे दोघांमध्ये तणाव असल्याची माहिती मिळत आहे.