तिरुवनंतपूरम - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी गाडीमधून जात असताना एका व्यक्तीने त्यांचे चक्क चुंबन घेतले आहे. या प्रकारामुळे राहुल यांना काय करावे, हेच सूचले नाही. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राजकारणी हे देखील लोकांना एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणेच वाटत असतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दलही लोकांमध्ये क्रेझ आहे. राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्त्व आवडत असल्याने त्याने गालावर किस केले असावे, असा अंदाज व्यक्त होतो आहे. राहुल गांधी यांनी त्याच्या या कृतीचे हसून स्वागत केले.
यापूर्वी राहुल गांधी हे गुजरात येथील वलसाडमध्ये एका रॅलीसाठी उपस्थित होते. त्यावेळी एका महिलेने त्यांचे मंचावर जाऊन चुंबन घेतले होते.
-
#WATCH A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad, #Gujarat pic.twitter.com/RqIviTAvZ9
— ANI (@ANI) February 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad, #Gujarat pic.twitter.com/RqIviTAvZ9
— ANI (@ANI) February 14, 2019#WATCH A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad, #Gujarat pic.twitter.com/RqIviTAvZ9
— ANI (@ANI) February 14, 2019
राहुल गांधी वायनाडमध्ये चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी वायनाडमधील चुनगाम आणि वलाडमधील बाधीत लोकांना काही आवश्यक वस्तूचे वितरण केले. केरळमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. राज्यातील वायनाड जिल्ह्यातील मल्लापूरम आणि पुथूमाला येथे भूस्खलन झाले होते.