ETV Bharat / bharat

ट्रम्प यांचा असाही एक चाहता... वाढदिवसानिमित्त चक्क ६ फुटी पुतळा उभारून दिली गावपंगत - telangana

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज ७३ वाढदिवस आहे. गेले ३ वर्ष त्यांचा हा फॅन ट्रम्प यांचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा आज ७३ वाढदिवस
author img

By

Published : Jun 15, 2019, 3:40 PM IST

हैदराबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ६ फुटी पुतळा उभारून एकाने वाढदिवस साजरा केला. तेलंगणातील जनगाव जिल्ह्याच्या कोन्ने गावातील बुसा क्रिश्ना यांनी ट्रम्प यांच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज ७३ वाढदिवस आहे. याचे औचित्य साधत तेलंगणातील त्यांचे फॅन असेलेले बुसा क्रिश्ना यांनी उत्साहात ट्रम्प यांचा वाढदिवस साजर केला आहे. यासाठी त्यांनी ट्रम्प यांचा ६ फुट उंच पुतळा उभारला. या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून पुजाही करण्यात आली.

एवढ्यावरच न समाधान मानता क्रिश्ना यांनी चक्क गावपंगतही दिली. यावरून त्यांचे ट्रम्प प्रेम दिसून येते. ते गेल्या तीन वर्षांपासून ते ट्रम्प यांचा वाढदिवस अशाच पद्धतीने साजरा करत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी दृढ व्हावे यासाठी त्यांनी यावेळी प्रार्थना केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.