नवी दिल्ली - जागतिकीकरणाच्या युगात उत्तम इंग्रजी बोलता येणे महत्त्वाचेच नव्हे तर अपरिहार्य बनले आहे. तुम्हाला अस्खलित इंग्रजी वाचता, बोलता येणे गरजेचे आहे. सध्या ऐका खेडेगावातील आजीबाईचा अस्खलित इंग्रजी बोलतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटेकऱयांनी या आजीबाईचे कौतूक केले आहे.
-
How many marks out of 10 for the old lady for this spoken English Test? pic.twitter.com/QmPSEd4o0L
— Arun Bothra (@arunbothra) March 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">How many marks out of 10 for the old lady for this spoken English Test? pic.twitter.com/QmPSEd4o0L
— Arun Bothra (@arunbothra) March 1, 2020How many marks out of 10 for the old lady for this spoken English Test? pic.twitter.com/QmPSEd4o0L
— Arun Bothra (@arunbothra) March 1, 2020
पोलीस निरक्षक अरूण बोथ्रा यांनी अस्खलित इंग्रजी बोलणाऱया या आजीबाईंचा व्हिडिओ आपल्या टि्वटवर खात्यावरून शेअर केला आहे. भगवानी देवी असे त्या आजीबाईंचे नाव असून त्या राजस्थानमधील झुन्झुनू येथील रहिवासी आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये आजीबाई महात्मा गांधींविषयी बोलत आहेत. 36 सेंकदाच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी गांधींचे विचार सांगितले आहेत. महात्मा गांधी हे जगातील महान नेत्यापैकी एक आहेत. हिंदू-मुस्लिम दोन्हींवर त्यांचे प्रेम होते. तसेच त्यांची राहणीमान अत्यंत साधे होते. महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. त्यांचा मृत्यू 30 जानेवरी 1948 ला झाला असून त्यांची समाधी दिल्लीमधील राजघाटावर आहे, असे त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितले.हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख लोकांनी पाहिला असून १० हजारापेक्षा अधिक लोकांनी याला पंसती दिली आहे.