आपण युद्ध करत आहोत. संपूर्ण जगभर कोरोना विषाणुशी लढा देत असताना, आपण जे काही पहात आहोत, त्याचे वर्णन करण्यासाठी यापेक्षा दुसरा पर्याय नाही. शत्रू अदृष्य असेल, पण तो भारताने या अगोदर ज्या शत्रुंचा सामना केला आहे, त्यापेक्षाही भयानक आहे. हे युद्ध अखेर किती मानवी बळी घेणार, हे आम्हाला माहित नाही, पण आमच्या राष्ट्रीय कल्याणात, आमच्या आयुष्याच्या मार्गात आणि संभवतः आमच्या भविष्यातही त्याने नक्कीच अडथळा आणला आहे.
पूर्वी, युद्धे ही गणवेषातील लोकाकंडून लढली जात आणि भारतीय लोकांना, बहुतेक वेळा त्याची झळ लागत नसे. आता ते सर्व काही बदलले आहे आणि आज प्रत्येक नागरिकाला सैनिक व्हावे लागत आहे. नागरिकापासून नागरिक-सैनिक असे हे संक्रमण सोपे असणार नाही कदाचित आणि लष्करी आयुष्यातील काही धडे मार्गदर्शन करतील.
जेव्हा पायदळातील एखादा सैनिक शत्रुच्या ठिकाणावर हल्ला करतो, तेव्हा तोफखान्यातील बंदूकधाऱ्यांनी आघाडीच्या मागे १५ किलोमीटर अंतरावर हजारो उच्च स्फोटक अशा तोफगोळ्यांनी शत्रुला धक्का देण्यासाठी त्या भागात अगोदरच भडिमार केलेला असतो. पायदळातील सैनिकांची कमीत कमी हानी व्हावी, या हेतूने अभियंत्यांनी सुरंगक्षेत्रातून रस्त्यावर स्फोट घडवलेला असतो आणि मागील तळावर असलेल्या पुरवठा करणार्यांनी दारूगोळा, अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा लढाऊ सैनिकापर्यंत पोहोचेल, याची सुनिश्चिती केलेली असते. जर प्रत्येक माणसाने आपले कर्तव्य चोख बजावले नाही तर, युद्धात पराभव निश्चितच असतो.
आज आपण अशा स्थितीला सामोरे जात आहोत की जेथे आघाडी आणि सुरक्षित क्षेत्रे नाहीत, गरिब-श्रीमंत फरक नाही. आमचे डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस अधिकारी आणि आणिबाणीकालीन कर्मचारी कोरोना विषाणुविरोधात लढाई करत असताना, प्रत्येक नागरिकाने त्यांच्यावरील बोजा कमी करण्यासाठी समर्थक सैनिक बनले पाहिजे.
दक्षिण कोरियात, २० जानेवारीला पहिला कोरोना विषाणुचा रूग्ण आढळला आणि ४ आठवड्यांनंतर, फक्त ३० रूग्ण होते. ३१ क्रमांकाची रूग्ण, अशी जिला कुख्याती आता मिळाली आहे, तिने सुरूवातीच्या परिक्षेला नकार दिला आणि तिचे सामाजिक कार्य सुरूच ठेवले. ज्या शिंचेओंजी चर्चच्या इमारतींच्या समूहात तिने हजेरी लावली, तेथे दक्षिण कोरियातील ६० टक्के रूग्ण आढळले आहेत. जर एखादा घसरला तर, आम्ही सर्वजण लढाई हरणार आहोत, हा स्पष्ट धडा यावरून मिळतो.
लष्करी लढा हा परिणामकारक ठरण्यामागील एक घटक आज्ञांना स्पष्टपणे चिकटून राहणे हा आहे. सॅम्युअल हटिंग्टनने आज्ञाधारकपणा हा सर्वोच्च लष्करी सद्गुण असल्याचे म्हटले आहे. जर त्वरित आज्ञापालन पुढे येत नसेल तर, युद्धे लढली जाऊ शकत नाहीत, जिंकली जाण्याचे प्रमाण तर त्याहून कमी असते. या कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यात, आमची अंतःक्रय संपूर्ण असली पाहिजे आणि कटिबद्धता दृढतापूर्वक असायला हवी. टिकाकार आणि उत्तरदायित्व यांच्यासाठी योजना खुल्या असू शकतील, पण आम्ही सामोरे जात असलेल्या धोक्याच्या स्वरूपामुळे निष्क्रियतेची किमत तीव्रतेने वाढणार आहे.
या पेचप्रसंगाच्या काळात आमच्या राजकीय नेत्यांनी घेतलेले निर्णय चुकीचे होते की बरोबर हे काळच ठरवेल, पण निर्णयांवर चर्चा करण्याची ही वेळ नाही. व्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे आणि शत्रुला पराभूत करण्यासाठी आम्ही निघालो असताना एकत्रितपणे कृती केली पाहिजे.
लष्करात, आम्ही नेहमी म्हणतो की शत्रुशी पहिला संपर्क झाल्यावर कोणतीही कृती करण्याची योजना टिकत नाही. जशा गोळ्या डागण्यास सुरूवात होते, परिस्थिती बदलते आणि सैनिक जे युद्घरत असतात त्यांना झटपट बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. तरीसुद्धा, जमिनीवर लढणारे सैनिक मूळ योजनेपेक्षा वेगळा पवित्रा स्विकारत असले तरीही, मूळ उद्देश्य हा प्राथमिक आणि कायम रहातो.
कोरोनाविषाणुविरोधातील या युद्घात आम्ही नागरिक गुंतलो असल्याने, आम्हाला अनपेक्षित आव्हानांचा मुकाबला करावा लागेल. या सर्वांचा मुकाबला करताना, आम्ही सुरूवातीला जी नियोजित केली होती, त्यापेक्षा आम्हाला वेगवेगळी धोरणे स्विकारावी लागतील, पण आम्ही उद्देश्य विसरता कामा नये-कोरोनाविषाणुचा प्रसार थांबवायचा आहे. या एकाच मिशनच्या दिशेने आमच्या सर्व कृती असल्या पाहिजेत.
अखेरीस, हे नमूद केले पाहिजे की सरकारचा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे, हे माहित असल्याने सैनिक लढतात. सैनिक आणि सरकार यांच्यात अलिखित प्रतिज्ञापत्र आणि परस्पर बंधन असते. वैयक्तिक त्याग करण्यास तयार रहाण्यासाठी सैनिकांना पाचारण केलेले असते तर त्यांना पुरेसा बंदोबस्त आणि सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास सरकारवर बंधन असते.
कोरोना विषाणुशी या लढाईत आम्हा सर्वांकडून त्यागाची मागणी आहे. त्याबदल्यात, सरकारने बोजा कमी करण्यासाठी ते जे काही करू शकते, ते केले पाहिजे. जीवनावश्यक खाद्यपदार्थ आणि औषधांचा पुरवठा, आजारी आणि वृद्धांना आरोग्य सेवा आणि जीवनावश्यक सेवा चालू रहातील,यांची खात्री केली पाहिजे.
दिर्घकालीन लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम अगोदरच दृष्यमान झाले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे, हे उघड आहे. प्रत्येक व्यावसायिक क्षेत्राला तडाखा बसला आहे आणि बेरोजगारी अधिक वाढली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की जागतिक मंदी २००८ च्या प्रचंड मंदीइतकीच वाईट असेल. गरिब आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होणारा परिणाम सौम्य करण्यासाठी तसेच व्यवसायांचे रक्षण करण्यासाठी सरकारने त्वरित वित्तीय आणि आर्थिक प्रोत्साहन येजना जाहीर केली पाहिजे.
एखाद्या देशाकडे सर्वाधिक उत्तमपणे सुसज्ज लष्कर असू शकते, पण जोपर्यंत सैनिकांची त्यांचे आयुष्य धोक्यात टाकण्याची तयारी नसते, तोपर्यंत ते युद्ध जिंकू शकत नाही. आज यापेक्षाही काही तरी महान असे पणाला लागले आहे, केवळ आमचे जीवनच नाही तर आमच्या जगण्याचा मार्गही. नागरिकांनी त्यांचे जीवन धोक्यात घालावे, असे मला म्हणायचे नाही. पण या युद्धात आम्हाला विजय मिळवायचा असेल तर एका निश्चित प्रमाणात त्याग करावा लागेल. आज तुम्ही जे काही कराल त्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे, या महात्मा गांधी यांच्या शब्दांची आम्हाला आठवण करून देत आहेत.
- लेफ्ट. जनरल डी. एस. हुडा (निवृत्त)