भुवनगिरी - तेलंगाणातील यादाद्री भुवनगिरी येथे एका मुलीने जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कीर्ती असे आरोपी मुलीचे नाव आहे. एकाचवेळी दोन मुलांशी प्रेमसंबंध ठेवल्यामुळे कीर्तीची आई तिच्यावर रागवली होती. त्या रागातूनच तिने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली आहे.
यादाद्री जिल्ह्यातील रामन्नापीट्टा येथील श्रीनिवास रेड्डी यांचे कुटुंब शहरात स्थलांतरित झाले. ते मुनाग्नूरमध्ये राहत होते. आई राजीता यांना आपली मुलीचे दोघांसोबत प्रेमसंबध असल्याचे समजले. मुलीने चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आईने तिला फटकारले. याचा राग किर्तीच्या मनात बसल्याने तिने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली आणि मृतदेह घरातच लपवला. मात्र तीन दिवसानंतर, वास येत असल्याने तिने आपल्या आईचा मृतदेह रामन्नापेटजवळ रेल्वे ट्रॅकवर फेकला.
वडिलांना विशाखापट्टणमला सहलीसाठी जात असल्याचे सांगून ती दुसर्या प्रियकरांसमवेत राहिली. वडील श्रीनिवास रेड्डी कामावरून घरी आल्यानंतर त्यानी पत्नीबद्दल विचारपूस केली. शेवटी पत्नीचा पत्ता न लागल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.चौकशीअंती मुलीनेच आईची हत्या केल्याचे उघड झाले.