ETV Bharat / bharat

जेव्हा कावळा कचरा उचलून कचराकुंडीमध्ये टाकतो, पाहा व्हिडिओ

मनुष्याला लाजवेल अशी कृती एका कावळ्याने केल्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही पण दंग व्हाल.

जेव्हा कावळा कचरा ऊचलून कचराकुंडीमध्ये टाकतो
author img

By

Published : Aug 24, 2019, 10:08 PM IST

नवी दिल्ली - मनुष्याला लाजवेल अशी कृती एका कावळ्याने केल्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही पण दंग व्हाल. बहूतेकवेळा माणसं हातातील कचरा हा कचराकुंडीमध्ये न टाकता बाहेर फेकतात. मात्र एका कावळ्याने कचरा उचलून कचराकुंडीमध्ये टाकला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये कावळ्याच्या चोचीमध्ये एक रिकामी बाटली असल्याचे पाहायला दिसते. कावळा ती पेयाची रिकामी बाटली कचराकुंडीमध्ये टाकतो. या व्हिडिओला लोकांनी पसंत केले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सुशांत नंदा नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर 600 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ रिटि्वट केला आहे.

जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे ती कचर्‍याची आहे. हातातील कचरा कचराकुंडीत न टाकता इतरत्र कुठेही फेकणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. मात्र अशा लोकांपुढे या कावळ्याने एक आदर्श ठेवला आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.