हैदराबाद : बुधवारी पाच राफेल लढाऊ विमाने अंबाला भारतीय हवाई दलाच्या तळावर उतरणार आहेत. या विमानांमध्ये पाच विमाने ही ३ जणांना बसण्यासाठी आहेत तर २ विमानांत दोघे बसू शकतात. ही विमाने भारतीय हवाई दलाची तुकडी नंबर १७ गोल्डन अॅरो मध्ये सामील केली जातील. सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतांना बळकट करण्यासाठी भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने ५९,००० कोटींना खरेदी करण्याचा करार केला. भारतीय हवाई दलाने दोन्ही तळावर शेल्टर्स, हँगर्स आणि देखभाल सुविधांच्या विकासासाठी ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी ही अंबाला हवाई दल तळावर तैनात केली जाईल. या भारतीय हवाई दलाचा तळ हा भारत-पाकिस्तान सीमेरेषेपासून २०० किमी अंतरावर आहे. राफेलची दुसरी तुकडी पश्चिम बंगालमध्ये हसिमारा इथे असेल. सर्व ३६ विमानांची डिलिवरी एप्रिल २०२२ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
या ३६ राफेल विमानांपैकी ३० विमाने लढाऊ जेट असतील आणि ६ ही प्रशिक्षणासाठी असतील. प्रशिक्षणासाठी असणारी विमाने ही २ सिटर असतील आणि त्यात लढाऊ विमानांची जवळजवळ सर्व वैशिष्ट्ये असतील.
एकूण सक्रिय भारतीय लढाऊ पथके : सध्या भारतीय हवाई दलाकडे ३० सक्रिय लढाऊ पथके आहेत. खाली दिलेल्या मंजुरीनुसार आता ही संख्या ४२ झाली आहे. प्रत्येक पथकाकडे १८ लढाऊ विमाने आहेत. ग्लोबल फायर पाॅवरच्या माहितीनुसार भारताकडे ५३८ लढाऊ विमाने आहेत.
राफेल लढाऊ विमानाची खास वैशिष्ट्ये..
- दोन इंजिनांचे लढाऊ विमान : राफेल लढाऊ विमानांमध्ये एसएनईसीएमए मधील २ एम८८-२ इंजिने आहेत. प्रत्येक इंजिन हे ७५ केएन थ्रस्टचे आहे.
- राफेल लढाऊ विमाने हवेतही एकमेकांना मदत करू शकतात : राफेल लढाऊ विमाने ही हवेत इंधन भरू शकतात. ही विमाने एकमेकांना इंधने भरण्यास मदत करू शकतात.
- दृष्टिपथात नसलेल्या लक्ष्याचा भेद करण्यासाठी या विमानातून मेटिओर क्षेपणास्त्र नेले जाऊ शकते. मेटिओर हे क्षेपणास्त्र दृष्टिक्षेपापलिकडचे लक्ष्य हवेतून हवेत भेदू शकते. १०० किलोमीटर लांब असलेले शत्रूचे विमान भेदू शकते.
- स्काल्प क्षेपणास्त्र हे जमिनीवरचे ३०० किलोमीटर दूर असलेले लक्ष्य भेदू शकते : राफेलमध्ये स्काल्प क्षेपणास्त्र ठेवता येईल. हे जमिनीवर लांब पल्ल्यावर हल्ला करू शकते. ३०० किलोमीटरच्या परिघात लक्ष्य भेदण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे.
- एका वेळी ६ आस्म क्षेपणास्त्रे वाहण्याची क्षमता : प्रत्येक आस्म क्षेपणास्त्राला जीपीएस आहे आणि इमेजिंग टरमिनल गायडन्स आहे. अगदी अचूकतेने १० मीटर्सपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते.
- याला होलोग्राफिक कॉकपिट आहे.
- राफेल एका वेळी ८ लक्ष्य साध्य करू शकते.
- राफेलमध्ये टिकण्याची क्षमता प्रचंड आहे.
- या आधुनिक लढाऊ विमानात हॅमर क्षेपणास्त्र असेल. (हॅमर क्षेपणास्त्राच्या मागणीवर काम सुरू आहे आणि राफेलसाठी फ्रेंच अधिकाऱ्यांनी अगदी कमी कालावधीत हॅमर उपलब्ध करून देण्याबद्दल मान्य केले आहे.)
भारतीय हवाई दलातली ही महत्त्वाची लढाऊ विमाने..
सुखोई एसयु ३० एमकेआय : रशियन बनावटीच्या या लढाऊ विमानात दोघे जण बसू शकतात. याला दोन इंजिने आहेत. यात एक एक्स 30 मिमी जीएसएच तोफा आणि ८००० किलोची बाह्य शस्त्रास्त्रे नेता येते. यात वेगवेगळ्या क्षमतेची हवेतून हवेत लक्ष्य करणारी क्षेपणास्त्रे नेण्याची क्षमता आहे. शिवाय यात अॅक्टिव किंवा सेमी अॅक्टिव रडार किंवा इन्फ्रा रेड होमिंग क्षेपणास्त्रेही यातून वापरता येऊ शकतात. याचा जास्तीत जास्त वेग २५०० किमी प्रति तास आहे (मॅच २.३५). सप्टेंबर २००२ पासून हे विमान सेवेत आहे. भारतीय हवाई दलात Su-30MKI जानेवारी २०२० पर्यंत कार्यरत आहे, या वर्षाच्या अखेरपर्यंत अशी अजून १२ पेक्षा जास्त विमाने आपल्याला मिळणार आहेत.

लढाऊ विमान मिराज २००० : फ्रेंच बनावटीचे हे विमान सिंगल सीटर हवाई संरक्षक आणि अनेक प्रकारे लढवय्या म्हणून काम करते. याचे एकच असलेले इंजिन जास्तीत जास्त २४९५ किमी प्रति तास (मॅच २.३) वेगाने जाऊ शकते. यात २ ३० एमएमच्या तोफा आहेत. शिवाय दोन ५३० डी मध्यम श्रेणीची आणि दोन आर ५५० मॅजिक २ क्लोज काॅम्बॅक्ट क्षेपणास्त्रे या विमानात आहेत. १९८५ मध्ये भारतीय हवाई दलात मिराजचा समावेश केला गेला. पाकिस्तानबरोबरच्या कारगिल युद्धात मिराजने महत्त्वाची कामगिरी केली. मिराजचा हवाई दलात समावेश झाल्यानंतर याचे नाव वज्र ठेवण्यात आले. संस्कृतमध्ये वज्रचा अर्थ विजांचा कडकडाट असा आहे . यात ५० जेट्स आहेत.

लढाऊ विमान मिग-२९ : याला दोन इंजिन्स आहेत. रशियन बनावटीचे हे विमान सिंगल सिटर असून लढाऊ विमानात हे सर्वश्रेष्ठ आहे. याचा जास्तीत जास्त वेग २४४५ किमी प्रति तास (मॅच-२.३ ) आहे. याची लढाई कमाल मर्यादा १७ किमी आहे. हे विमान ३० एमएमची तोफ, शिवाय आर-२७ आर मध्यम पल्ल्याची रडार गायडेड क्षेपणास्त्र नेऊ शकते. भारतीय हवाई दल सध्या सुधारित श्रेणीचे मिग २९ युपीजी वापरते. हे आतापर्यंतचे सर्वात प्रगत मिग-२९ आहे. मिराज २००० साठी मदतनीस म्हणून कारगिल युद्धात याचा भरपूर वापर केला गेला. १९८५ मध्ये या लढाऊ विमानाचा भारतीय हवाई दलात याचा समावेश केला होता.

लढाऊ विमान मिग-२१ बायसन : सोव्हिएत मिग-२१ बायसन हे मिग-२१ ची सुधारित आवृत्ती आहे. भारतीय हवाई दलात १९८०च्या सुरुवातीला या विमानाचा समावेश करण्यात आला. रशियन बनावटीचे मिग-२१ बायसन हे भारताच्या सहा लढाऊ जेट्सपैकी एक आहे. एक इंजिन असलेले हे विमान सिंगल सीटर आहे. ते अनेक प्रकारे लढाऊ विमान आहे.
