हुबळी - कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्थानकावर स्फोट झाल्याचं वृत्त समोर येत आहे. यामध्ये हुसेन साब नायकवाले नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
Hubli: A box exploded at Hubli Railway Station, today. One person injured, and has been admitted to hospital. Police and Railway Protection Force are at the spot. #Karnataka pic.twitter.com/DtjykGbhJm
— ANI (@ANI) October 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hubli: A box exploded at Hubli Railway Station, today. One person injured, and has been admitted to hospital. Police and Railway Protection Force are at the spot. #Karnataka pic.twitter.com/DtjykGbhJm
— ANI (@ANI) October 21, 2019Hubli: A box exploded at Hubli Railway Station, today. One person injured, and has been admitted to hospital. Police and Railway Protection Force are at the spot. #Karnataka pic.twitter.com/DtjykGbhJm
— ANI (@ANI) October 21, 2019
स्थानकावर हुसेन नावाच्या व्यक्तीने एक बेवारस बॅग उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा सामानाचा स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण स्थानकावर एकच खळबळ उडाली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की रेल्वे स्थानकात असलेल्या एका कार्यालयाच्या काचाही फुटल्या आहेत. संबधीत खोक्यामध्ये एक बादली होती. स्फोटक पदार्थांनी भरलेली बादली कोल्हापूरच्या एका आमदाराच्या नावावर पाठवण्यात आल्याची माहित आहे. भाजप नाही, काँग्रेस नाही फक्त शिवसेना असे त्या बादलीवर लाल अक्षरात लिहलेलं आहे. त्या बादलीमध्ये स्फोटक पदार्थ असल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती आहे.
हुबळी रेल्वे स्थानक हे हुबळी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.