ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये भीषण अपघात: ट्रेलरने कारला दिली धडक, 8 जण ठार

राजस्थानच्या चित्तौडगढमधील उदयपूर-निंबाहेरा राज्य महामार्गावर शनिवारी ट्रेलर आणि क्रूझर कारची टक्कर झाली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व लोक रतलाममधील अक्याकला गावचे रहिवासी आहेत.

राजस्थानमध्ये भीषण अपघात
राजस्थानमध्ये भीषण अपघात
author img

By

Published : Dec 13, 2020, 4:29 AM IST

रतलाम / चित्तौडगढ - राजस्थानच्या चित्तौडगढमधील उदयपूर-निंबाहेरा राज्य महामार्गावर शनिवारी ट्रेलर आणि क्रूझर कारची टक्कर झाली. यामध्ये वधू-वर यांच्यासह कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतक रतलाममधील अक्याकला गावचे रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक राजस्थानच्या सांवलिया सेठ दर्शनासाठी जात होते.

ही घटना निंबाहेरा-उदयपूर महामार्गावरील निकुंभ पोलीस स्टेशन परिसरातील नपावली ग्रामपंचायतीच्या बावडी गावाजवळ घडली. मंगळवाडहून निंबाहेराकडे जाणाऱ्या ट्रेलरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या क्रूझर वाहनाला धडक दिली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता.

राजस्थानमध्ये भीषण अपघात

उपस्थितांनी दिली पोलिसांना माहिती-

अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच निकुंभ पोलीस अधिकारी विनोद मेनारिया माया गुप्ता घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लोकांच्या मदतीने क्रूझरमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यापैकी 4 जणांना बाहेर काढण्यात आले असून काही लोक अजूनही अडकले आहेत.

जेसीबीच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन-

ट्रेलरमध्ये अडकलेले वाहन काढण्यासाठी जेसीबीला बोलविण्यात आले आहे. जेसीबीच्या मदतीने, क्रूझर काढली जाईल, अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढू शकतो. सुरुवातीला 7 लोक ठार झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस अडकलेल्या लोकांना वाहनांमधून बाहेर काढत आहेत.

चित्तोडगड जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य प्रगतीपथावर आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबरला वधू आणि वर दोघांचे लग्न झाले होते. 2 दिवसानंतर हा आनंद शोकात बदलला. ही घटना ऐकल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा- जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.