ETV Bharat / bharat

आमदार खरेदी प्रकरण : ऑडिओ क्लिपची 8 सदस्यीय पथक करणार चौकशी - राजस्थान काँग्रेस न्यूज

आमदार खरेदी प्रकरणी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी 8 सदस्यांची विशेष टीम गठित केली आहे. या विशेष पथकाची कमान पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

आमदार खरेदी प्रकरण
आमदार खरेदी प्रकरण
author img

By

Published : Jul 19, 2020, 9:54 AM IST

नवी दिल्ली - आमदार खरेदी प्रकरणी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी 8 सदस्यांची विशेष टीम गठित केली आहे. एसओजी व्यतिरिक्त एटीएस, सीआयडी सीबी आणि जोधपूर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. या विशेष पथकाची कमान पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. एसपी विकास शर्मा यांच्या सुपर व्हिजनमध्ये एसओजीची एक टीम शुक्रवारी मानेसरला चौकशीसाठी पोहोचली होती.

विकास शर्मा व्यतिरिक्त या टीममध्ये एटीएसचे अतिरिक्त एसपी धर्मेंद्र यादव, सीआयडी सीबीचे अतिरिक्त एसपी जगदीश व्यास, जोधपूर पोलीस आयुक्तालय एसीपी कमल सिंग, एटीएसचे डीवायएसपी मनीष शर्मा, सीआयडी सीबी निरीक्षक कैलाश जिंदल, एटीएसचे पोलीस निरीक्षक सुमन काविया यांचा आणि एटीएसचे पोलीस निरीक्षक रमेश परिक यांचा समावेश आहे. यासह संपूर्ण प्रकरणात सखोल संशोधन करून आरोपींना अटक करण्याचे निर्देशही या टीमला देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री अशोक गहलोत शनिवारी पुन्हा एकदा राजभवनात दाखल झाले होते. त्यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली आणि बहुमत असल्याचा दावा केला. यासह त्यांनी 102 आमदारांची यादी राज्यपाल कलराज मिश्रा यांना सोपवली आहे. लवकरच विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविले जाण्याची शक्यता आहे.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारमध्ये बर्‍याच दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. गेहलोत सरकार पाडण्याच्या प्रयत्न केल्याचे आरोप भाजपवर करण्यात आले. सचिन पायलट भाजपाच्या प्रभावाखाली येऊन 8 कोटी लोकांच्या निवडून आलेल्या सरकारला पाडण्याचा कट रचत असल्याचेही मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.