सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा येथे शनिवारी माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यावेळी माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे 14 जवान जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आले.
सुकमामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 14 जवान जखमी झाले. दोन जवानांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. जखमी जवानांना चकमकीच्या ठिकाणावरून सुरक्षित स्थळी आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवादीविरोधी मोहीम हाती घेतली आहे.