ETV Bharat / bharat

'आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांना 8 लाख मेट्रिक टन धान्य वाटप' - आत्मनिर्भर पॅकेज

केंद्र सरकारने आतापर्यंत 8.00 लाख मेट्रिक टन धान्य वाटप केले आहे. यामध्ये 2.44 लाख मेट्रिक टन गहू आणि 5.56 लाख मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे. त्यांनी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांशी समन्वय साधण्याचे व अन्नधान्याचे वाटप वेगवान करण्याचे निर्देशही भारतीय खाद्य महामंडळाला दिले आहेत.

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री
author img

By

Published : May 29, 2020, 8:03 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी गुरुवारी भारतीय खाद्य महामंडळाचे (एफसीआय) विभागीय कार्यकारी संचालक आणि सर्व सरव्यवस्थापकांसह व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत त्यांनी कोरोना संकटात केंद्र सरकारकडून लागू केलेल्या योजनांच्या अंमलबजावणी व प्रगतीचा आढावा घेतला. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 8.00 लाख मेट्रिक टन (एलएमटी) धान्य वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आतापर्यंत 8.00 लाख मेट्रिक टन धान्य वाटप केले आहे. यामध्ये 2.44 लाख मेट्रिक टन गहू आणि 5.56 लाख मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे. त्यांनी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांशी समन्वय साधण्याचे व अन्नधान्याचे वाटप वेगवान करण्याचे निर्देशही भारतीय खाद्य महामंडळाला दिले आहेत.

आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत आठ दशलक्ष स्थलांतरित कामगारांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जात आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना अन्नधान्यही विनामूल्य मिळणार आहे. पुढील दोन महिने, प्रवासी कामगारांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि प्रत्येक कुटुंबासाठी एक किलो हरभराडाळ मोफत दिली जात आहे.

लॉकडाऊनमध्ये, अनेक स्वयंसेवी संस्थांनी देशातील विविध ठिकाणी मदत केंद्र उभारली असून या संस्था गरीबांना दोन वेळचे जेवण दिले जाते. खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत या स्वयंसेवी संस्थांना भारतीय खाद्य महामंडळालाकडून 21 रुपये किलो गहू आणि 22 रुपये किलो तांदूळ देण्यात येत आहे. लॉकडाऊन दरम्यान, मदत केंद्र चालविणार्‍या स्वयंसेवी संस्थांना 21 रुपये प्रतिकिलो दराने 886 टन गहू आणि २२ रुपये प्रतिकिलो दराने 7778 टन तांदूळ देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.