ETV Bharat / bharat

हिरोशिमा - नागासाकी अणुबॉम्ब हल्ल्याची 74 वर्ष....जखमा अजूनही ताज्याच - दुसरे जागतिक महायुद्ध

अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला होता. त्यानंतर सुदैवाने जगात आजपर्यंत कुठेही अणुहल्ला झालेला नाही. या दुर्दैवी घटनेला आज 74 वर्षे पूर्ण होत आहेत.

हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब हल्ल्याची 74 वर्ष....जखमा अजूनही ताज्याच
author img

By

Published : Aug 9, 2019, 11:54 AM IST

Updated : Aug 9, 2019, 2:06 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला होता. त्यानंतर सुदैवाने जगात आजपर्यंत कुठेही अणुहल्ला झालेला नाही. या दुर्दैवी घटनेला आज 74 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमीत्ताने या घटनेचा एक आढावा.

हिरोशिमा - नागासाकी अणुबॉम्ब हल्ल्याची 74 वर्ष.

६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमा शहरावर 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या हल्ल्यात 1 लाख 40 हजार नागरिकांनी जीव गमावला होता, तर 9 ऑगस्ट १९४५ रोजी 'बॉक्सकार' नावाच्या बी.२९ विमानाने 'फॅट मॅन' नावाचा अणूबॉम्ब नागासाकी शहरावर टाकला होता. या हल्ल्यात नागासाकीमधल्या 80 हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. यात जे जगले त्यांना कायमचे अपंगत्व आले.

74 years of the Hiroshima Nagasaki atomic bomb attack
हल्ल्यात लोकांनी आपले प्राण गमावले

दुसरे जागतिक महायुद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपत आले होते. दुसऱ्या महायुध्दामध्ये अमेरिका प्रत्यक्ष भाग न घेता मित्र राष्ट्रांना मदत करत होती. यावेळी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर पोर्टवर हल्ला केला. यामध्ये अमेरिकेचे अतोनात नुकसान झाले होते. या हल्ल्याच्या उत्तरादाखल अमेरिकेन हिरोशिमा आणि नागसाकीवर हल्ला केला. यानंतर, 14 ऑगस्ट 1945 रोजी जपानने बिनशर्त आत्मसमर्पण केले. जपानच्या आत्मसमर्पणानंतर युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले.

नागासाकी अणुबॉम्ब हल्ल्याची 74 वर्ष

जपानवर हल्ला केल्यानंतर बी -२ सुपरफोर्टरेस बॉम्बर एनोला गे विमानाचे सह पायलट रॉबर्ट लुईस यांनी आपल्या फ्लाइट लॉगमध्ये 'हे देवा आम्ही हे काय केले' असे लिहिले होते. आजही हिरोशिमा-नागासाकीची ही घटना संपूर्ण मानवी सभ्यतेवर काळा डाग मानली जाते.

पीस मेमोरियल पार्कमध्ये 6 ते ९ ऑगस्ट रोजी मृतांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी जगभरातील लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत, अणूबॉम्बचा वापर पून्हा करू नये अशी भावना जगभरातून व्यक्त होत आहे. जपाननेतर अणुबॉम्ब शस्त्रांवर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या करारात सामील होण्याचे आवाहन अण्वस्त्रधारी देशांना केले आहे. जुलै 2017 पर्यंत 122 देशांनी या करारावर सह्या केल्या आहेत. अद्याप 50 राष्ट्रांनी या करारावर सह्या केलेल्या नाहीत.

जखमा अजूनही ताज्याच

सध्या अमेरिका, रशिया, चीन, जपान, भारत, पाकिस्तान यासह इतरही काही देशांकडे अण्वस्त्र आहेत. मात्र, अण्वस्त्रांपासून होणारे धोके लक्षात घेता अनेक देशांनी बचावासाठी पर्यायी व्यवस्थाही केली आहे. रशियाने अणू हल्ल्याच्या वेळी आश्रय घेता यावा यासाठी जमिनीत खोल भुयारे खोदली आहेत. तर अमेरिकेने दूर अंतरावरून होणाऱ्या आगामी हल्ल्याची पूर्वसूचना देणारी रडारयंत्रणा कोट्यवधी डॉलर्स खर्च करून उभारली आहे. असे असले तरी अण्वस्त्रांपासून सध्या तरी पूर्ण बचाव करता येण्याइतकी साधने उपलब्ध झालेली नाहीत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 9, 2019, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.