ETV Bharat / bharat

दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोना, संपर्कातील ७२ जण क्वारंनटाईन

कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन दिवसांपूर्वी एका दिवशी ३५६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे दिल्ली सरकार अधिक खबरदारी घेत आहे.

author img

By

Published : Apr 16, 2020, 12:00 PM IST

South Delhi  Self Quarantine  Delivery Boy  Pizza Chain  Covid 19  Novel Coronavirus  Positive Case
प्रातिनिधीक छायाचित्र

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये एका पिझ्झा डिलीव्हरी बॉयला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संपूर्ण हौज खास आणि मालवीय नगर या परिसरातील ७२ जणांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन दिवसांपूर्वी एका दिवशी ३५६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे दिल्ली सरकार अधिक खबरदारी घेत आहे. त्यातच आता एका पिझ्झा डिलीवरी बॉयला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ७२ जणांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षणे आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे, असे दक्षिण दिल्लीचे जिल्हाधिकारी बी. एन. मिश्रा यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.