ETV Bharat / bharat

गोव्यात एकूण ७२.०४ टक्के मतदान; १२ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद

उत्तर गोव्यात ७३.९२ तर दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघात ७०.१५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

गोवा लोकसभा निवडणूक
author img

By

Published : Apr 24, 2019, 3:04 AM IST

पणजी - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये गोव्यात एकूण ७२.०४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. येथे २ लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यासाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्याचबरोबर तिन विधानसभेच्या जागांवर पोट निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी मागच्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मतदानामध्ये ४.८२ टक्के घट झाले.

गोव्यामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली होती. मतदारांनी अधिकाअधिक मतदान करावे यासाठी प्रशासनाने मोठी व्यवस्था केली होती. सोबतच दिव्यांगांसाठी विशेष केंद्रांची सुविधा करण्यात आली होती. उत्तर गोव्यात ७३.९२ तर दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघात ७०.१५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांसोबतच गोवा विधानसभेच्या तीन जागांसाठी मतदान झाले. यामध्ये मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा यांचा समावेश आहे. येथे अनुक्रमे ८१.६१ टक्के, ८०.०९ आणि ७५.१७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. यावेळी सर्वच मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिन वापरण्यात आली होती.

ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकादरम्यान १४ बॅलेट युनिट, २५ सेंट्रल युनिट आणि ४० व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. तर प्रत्यक्ष मतदानावेळी १० बॅलेट युनिट, १० सेंट्रल युनिट आणि २९ व व्हीव्हीपॅट बदलण्यात आलेत. एकुण १६५२ मतदारसंघात अशी यंत्रणा वापरण्यात आली होती. तर, विधानसभेच्या तीन जागांसाठी प्रत्येकी १३३ सेंट्रल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात आलेत.

उत्तर गोव्यासाठी पणजीमध्ये तर दक्षिण गोव्यासाठी मडगालमध्ये 'स्ट्रॉन्ग रूम ' बनविण्यात आली आहे. त्यासाठी दुहेरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रुमच्या आतील बाजूला केंद्रीय सुरक्षारक्षक तर बाहेरील बाजूला स्टेट मिलिट्री २४ तास पहारा देणार आहेत. तसेच येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज विभागीय निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात सरळ प्राप्त होणार आहेत. स्ट्रॉन्ग रुम उघडताना किंवा बंद करताना मान्यताप्राप्त पक्षाचे प्रतिनिधी, उमेदवार यांची उपस्थित आवश्यक आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते रुमच्या बाहेर राहून पाहणी करू शकतात.

Intro:Body:

ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकादरम्यान 14 बॅलेट युनिट, 25 सेंट्रल युनिट आणि 40 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. तर प्रत्यक्ष मतदानावेळी 10 बॅलेट युनिट, 10 सेंट्रल युनिट आणि 29 व व्हीव्हीपॅट बदलण्यात आलेत. एकुण 1652 मतदारसंघात अशी यंत्रणा वापरण्यात आली होती. तर, विधानसभेच्या तीन जागांसाठी प्रत्येकी 133 सेंट्रल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात आलेत.

उत्तर गोव्यासाठी पणजीमध्ये तर दक्षिण गोव्यासाठी मडगालमध्ये 'स्ट्रॉन्ग रूम ' बनविण्यात आली आहे. त्यासाठी दुहेरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रुमच्या आतील बाजूला केंद्रीय सुरक्षारक्षक तर बाहेरील बाजूला स्टेट मिलिट्री 24 तास पहारा देणार आहेत. तसेच येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज विभागीय निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात सरळ प्राप्त होणार आहेत. स्ट्रॉन्ग रुम उघडताना किंवा बंद करताना मान्यताप्राप्त पक्षाचे प्रतिनिधी, उमेदवार यांची उपस्थित आवश्यक आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते रुमच्या बाहेर राहून पाहणी करू शकतात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.