ETV Bharat / bharat

आसाम तेलविहीर आग : 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले, 35 घरांचे मोठे नुकसान

गुरुवारी तिसऱ्या दिवशीही तेल विहिरीला आग विझवण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न केले. या भागातील 35 हून अधिक घरे जळून खाल झाली आहेत. तर, जवळपास 7 हजार लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात बुधवारी दोघा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, ओएनजीसीचे (Oil and Natural Gas Corporation) चार कर्मचारी जखमी झाले.

आसाममधील तेलविहिरीला आग
आसाममधील तेलविहिरीला आग
author img

By

Published : Jun 12, 2020, 9:34 AM IST

गुवाहाटी (आसाम) - आसाममध्ये तिनसुकिया जिल्ह्यातील बागजन तेल विहिरीला मंगळवारी आग लागली. आग विझवण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. लष्कराने ने पूर्ण परिसराला वेढा दिला असून या भागात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि अभियंत्यांनी गुरुवारी तिसऱ्या दिवशीही तेल विहिरीला आग विझवण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न केले. या भागातील 35 हून अधिक घरे जळून खाल झाली आहेत. तर, जवळपास 7 हजार लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

या ठिकाणी आग विझवण्याच्या प्रयत्नात बुधवारी दोघा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, ओएनजीसीचे (Oil and Natural Gas Corporation) चार कर्मचारी जखमी झाले. आगीचे लोळ इतके तीव्र होते की, ते 10 किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते.

‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओआयएलच्या गॅस विहिरीला लागलेल्या आगीबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ओआयएलच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली,’ असे ओआयएलचे (Oil India Limited) प्रवक्ते त्रिदिव हजारिका म्हणाले.

विहीरीच्या सभोवतीच्या भागाव्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर भागातील आग बहुधा विझलेली आहे. तथापि, विहीर तोंडावर कॅप बसवून ते बंद करेपर्यंत गॅस जळत राहणे चालूच राहील, अशी माहिती मिळाली आहे.

या आगीत विहिरीच्या आजूबाजूच्या सुमारे 200 मीटरच्या वर्तुळातील 15 घरे पूर्णपणे जळून गेली आहेत. तर, आणखी 15 घरे काही प्रमाणात जळली आहेत. आजूबाजूच्या 7 हजार रहिवाशांना तेल कंपन्यांनी उभारलेल्या १२ मदत शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे.

ही आग पूर्णपणे नियंत्रित करण्यासाठी किमान चार आठवडे किंवा एक महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती तिनसुकिया जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

सिंगापूरस्थित आपात्कालीन व्यवस्थापन कंपनीच्या तज्ज्ञांचे पथकही मागील 16 दिवसांपासून गॅस आणि तेल गळती रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप हे होऊ शकले नाही. याच वायुगळतीमुळे ही भीषण आग लागली आहे. आता ती विझवण्यासाठी राज्य सरकारला हवाई दलाची मदत मागण्याची शिफारस करण्यात येत आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांना तेल विहिरीच्या स्फोटाच्या घटनेसंदर्भातील ताज्या घडामोडींविषयी माहिती दिली. "पंतप्रधानांनी बाधित क्षेत्रातील लोकांसाठी सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली," असे आसाम सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याविषयीचे ट्विटदेखील पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. सोनोवाल यांनी मंगळवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून आग विझवण्यासाठी आयएएफची (भारतीय हवाई दल) मदत मागितली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ओआयएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, आग 1.5 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये नियंत्रित ठेवली गेली आहे. परंतु, अद्यापही विहिरीच्या तेलातून नैसर्गिक वायू 'अनियंत्रितरीत्या' बाहेर पडत आहे. यामुळे आगीची तीव्रता कायम आहे.

हे आगीने हाहाकार उडवलेल्या ठिकाणी सर्व काही विनाशाकडे ओढले गेले आहे. याच्या आजूबाजूच्या परिसरात एक प्रसिद्ध तलावाही आहे. शेजारील पिके असलेली शेतजमीन, तसेच लगतच्या खेड्यातील तलाव आणि ओल्या जमिनीवरही याचा भयंकर परिणाम झाला आहे. आणखीही दिवसेंदिवस हा धोका वाढत आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया येथील स्थानिक लोकांनी दिल्या आहेत. याशिवाय, तज्ज्ञ आणि पर्यावरणवादी, वन्यजीव कार्यकर्तेही या भागातच डिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान असल्याने काळजी व्यक्त करत आहेत. हे उद्यान घटनास्थळापासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असून येथे स्थानिक प्रजातीचे म्हणून ओळखले जाणारे रानटी घोडे आहेत.

केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान, एनडीआरएफ, ओआयएल आणि ओएनजीसीचे अभियंता आणि तज्ञ आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

गुवाहाटीच्या पूर्वेकडील सुमारे 550 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिनसुकियातील बागजान येथील तेलाच्या विहिरीतून 27 मे पासून गॅस गळती सुरू होती. त्यामुळे या प्रदेशातील वन्यजीव, ओल्या-आर्द्र जमिनी आणि जैवविविधता यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ओआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशीलचंद्र मिश्रा यांनी आसाम उद्योग व वाणिज्यमंत्री चंद्र मोहन पटवारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पटवारी सध्या तिनसुकीया येथे आहेत. या वेळी तिनसुकियाचे उपायुक्त भास्कर पेगू उपस्थित होते. त्यांनी आगीची सध्याची स्थिती आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ओआयएलकडून केले जात असलेले प्रयत्न यांचे मूल्यमापन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.