नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकाचा सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिआ आज पार पडली. देशभरातील एकूण ५९ जागांसाठी ६३.३ टक्के मतदान झाले, अशी माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली.
विविध राज्यातील मतनानाबाबतच संपूर्ण माहिती आल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानी सांगितले.
आज ९७९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले. सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८०.१६%, मतदानाची नोंद झाली. उत्तर प्रदेश -१४, हरियाणा -१०, बिहार -८, मध्यप्रदेश-८, पश्चिम बंगाल -८, नवी दिल्लीतील ७ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली