कोलकाता - लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील विविध विभागातून ६०० जणांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बंगाली नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी एकत्र जमले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
कोरोनामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. तरीही काही नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. काल मंगळवारी (१४ एप्रिल) बंगाली नवीन वर्ष होते. त्यासाठी शहरातील विविध भागात अनेक नागरिक एकत्र जमले होते. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. तसेच आता त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहे. यासोबतच ९५ वाहने देखील जप्त करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.