भुवनेश्वर - ओरिसा राज्यात जादूटोण्याच्या संशयातून ६ जणांचे दात काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सहा जणांना बळजबरीनं मानवी विष्ठा खायला लावल्याचा किळसवाना प्रकारही घडला आहे. गावामध्ये जोदूटोणा करत असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी हे कृत्य केलं. ही घटना राज्यातील गंजाम जिल्ह्यामध्ये घडली.
-
Odisha: Suspected of practicing witchcraft, 6 men tortured, forced to eat human excreta
— ANI Digital (@ani_digital) October 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read more @ANI Story | https://t.co/o7Dw6b8gSr pic.twitter.com/x7ISGFsMc9
">Odisha: Suspected of practicing witchcraft, 6 men tortured, forced to eat human excreta
— ANI Digital (@ani_digital) October 3, 2019
Read more @ANI Story | https://t.co/o7Dw6b8gSr pic.twitter.com/x7ISGFsMc9Odisha: Suspected of practicing witchcraft, 6 men tortured, forced to eat human excreta
— ANI Digital (@ani_digital) October 3, 2019
Read more @ANI Story | https://t.co/o7Dw6b8gSr pic.twitter.com/x7ISGFsMc9
जादूटोणा करत असल्याचा संशयावरून जिल्ह्यातील गोपालपूर खेडेगावामधील सहा वयोवृद्ध व्यक्तींना स्थानिक नागरिकांनी जबाबदार धरले. त्यांनी केलेल्या जादूटोण्यामुळे गावातील ३ महिलांचा मृत्यू झाला तर ७ जण आजारी पडल्याचा संशय नागरिकांना होता.
हेही वाचा - कोंढव्यातील 'त्या' अपहृत मुलीची ३ तासांत सुटका, अंधश्रद्धेतून अपहरणाची पालकांना शंका
संशयावरुन मंगळवारी संध्याकाळी गावातील लोकांनी ६ जणांना घराच्या बाहेर खेचत आणले. या सहाही जणांचे दात पाडण्यात आल्यानंतर त्यांना बळजबरीनं मानवी विष्ठा खायला घातली. या सहा जणांनी इतर गावकऱ्यांकडे मदतीसाठी आक्रोश केला असता त्यांना मदतीला कोणीही आले नाही.
घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधिक्षक ब्रिजेश कुमार यांनी पथकासह गावामध्ये धाव घेतली. पोलिसांनी जखमींना जमावाच्या ताब्यातून सोडवले. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत २९ जणांना अटक केली असून त्यामध्ये २२ महिलांचा समावेश आहे.
हेही वाचा - विद्यार्थीनीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी पोलीस बंदोबस्तात एनओसी
जखमी झालेले सर्व वृद्ध नागरिकांचे वय ६० वर्षांपुढे आहे. मारहाणीमध्ये सहभागी असलेल्या आणखी लोकांची नावे पुढे आले आहेत, त्यांना लवकरच अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अटक करतील या भीतीने गावातील पुरुष गाव सोडून पळून गेल्यामुळे गाव अक्षरशहा रिकामे झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी गावामध्ये बंदोबस्त वाढवला आहे.