ETV Bharat / bharat

केरळात ५१ तर कर्नाटकात ३१ जणांचा पुरामध्ये मृत्यू, बचावकार्य सुरू

कर्नाटक, केरळसह देशातील अनेक राज्यांमध्ये पूर आला आहे. केरळ राज्यामध्ये मृतांचा आकडा ५१ वर पोहचला आहे. तर कर्नाटकमध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

बचावकार्य सुरू
author img

By

Published : Aug 11, 2019, 8:33 AM IST

Updated : Aug 11, 2019, 10:50 AM IST

नवी दिल्ली - कर्नाटक, केरळसह देशातील अनेक राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळ राज्यामध्ये मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे. तर कर्नाटकमध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. हवाई दल, नौदल आणि आपत्ती निवारण पथकाद्वारे पूराच्या पाण्यात अडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह हवाई मार्गाने कर्नाटकातील पूरपरिस्थीतीचा आढावा घेणार आहेत.

  • Union Home Minister Amit Shah will do an aerial survey of the flood affected areas of Belagavi district, Karnataka today. (File pic) pic.twitter.com/upkFiMc7jB

    — ANI (@ANI) August 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केरळमधील ८ जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कर्नाटकातील १७ जिल्ह्यांना पुरग्रस्त घोषित करण्यात आले आहे. कर्नाटकातील सुमारे ८० तालूके पुरामुळे प्रभावित झाले आहेत. रायचूर जिल्ह्यामध्ये हवाई दलाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत अडकेलल्या नागरिकांना बाहेर काढले. बेळगाव जिल्ह्यातही ३ हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ३७ जणांना वाचवण्यात आले.

वायनाड जिल्ह्यातील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. मेपाडी जवळील पुथ्थुमाला येथील दरड कोसळ्याची घटना सोडता दुसरी कोणतीही मोठी घटना घडली नाही, असे वायनाडचे जिल्हाधिकारी ए. आर अजयकुमार यांनी सांगितले. दरड कोसळल्यामुळे कर्नाटकामध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रुळ उखडले आहेत.

देशभरात आलेल्या पुरामुळे लाखो लोकांना विस्थापित करण्यात आले आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त पूरग्रस्तांना मदत पाठवत आहेत. कर्नाटकातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचे आदेश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिले आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 11, 2019, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.