ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशात चारचाकींची समोरासमोर धडक, ५ जण ठार - दोन चारचाकींचा भीषण अपघात

राजगड जिल्ह्याच्या सारंगपूर शहराजवळ गोपालपुरा बायपासवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने
अपघातग्रस्त वाहने
author img

By

Published : Jun 22, 2020, 9:57 AM IST

Updated : Jun 22, 2020, 10:14 AM IST

राजगड (मध्यप्रदेश) - राजगड जिल्ह्याच्या सारंगपूर शहराजवळ गोपालपुरा बायपासवर दोन चारचाकी वाहनांमध्ये समोरा-समोर धडक होऊन एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत.

ही घटना आज (दि. 22 जून) सकाळी घडली. एक चारचाकी वाहन गुना येथून इंदूरकडे जात होती. त्याचवेळी महाराष्ट्रातून लखनऊच्या दिशेने जाणाऱ्याला चारचाकी वाहनाला गुनाकडून येणाऱ्या वाहनाने समोरा-समोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्थांनिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळील सारंगपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.

इंदूरकडे निघालेल्या चारचाकी वाहनात पाच जण प्रवास करत होते. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर लखनऊकडे निघालेल्या वाहनातही काही साधुंसह पाच जण प्रवास करत होते. यातील एका साधूचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सलग १६ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम; एक लीटरसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

Last Updated : Jun 22, 2020, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.