ETV Bharat / bharat

जयपूरमध्ये ५ चीनी नागरिक आढळल्याने खळबळ; तपासणीनंतर विलगीकरण कक्षात - जयपूर

सर्व चीनी नागरिकांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले. यांच्यासोबत एक नेपाळी युवकही होता, अशी माहिती एडिशनल डीसीपी सुमीत गुप्ता यांनी दिली.

5-chinese-national-found-in-jaipur
जयपूरमध्ये ५ चीनी नागरिक आढळल्याने खळबळ; तपासणीनंतर विलगीकरण कक्षात
author img

By

Published : Apr 1, 2020, 10:45 AM IST

जयपूर - राजस्थानच्या जयपूरमधील चारदिवारी भागात ५ चीनी नागरिक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कंवर नगर परिसरात एका गेस्ट हाऊसमध्ये सर्वेक्षणादरम्यान ५ चीनी नागरिक आढळून आले. यानंतर रुग्णवाहिका पाठवून सर्वांना रूग्णालयात पाठवण्यात आले. संपूर्ण परिसर सॅनेटाईज करण्यात आला आहे.

जयपूरमध्ये ५ चीनी नागरिक आढळल्याने खळबळ; तपासणीनंतर विलगीकरण कक्षात

माणक चौक पोलीस ठाण्याने सर्व परिसर सीलबंद केला आहे. संपूर्ण परिसरात मेडिकल टीम आणि पोलीस डोर टू डोर सर्व्हे करत आहेत. यादरम्यान, कंवर नगरमधील सर्व्हे करत असताना ५ चीनी नागरिक असल्याची सूचना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सर्व चीनी नागरिकांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले. यांच्यासोबत एक नेपाळी युवकही होता, अशी माहिती एडिशनल डीसीपी सुमीत गुप्ता यांनी दिली.

चीनी नागरिकांची मेडिकल तपासणी करून त्यांना गेस्ट हाऊसमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला आहे. मेडिकल टीमसह पोलीस यावर नजर ठेवून आहेत. यापैकी २ चीनी नागरिक नोव्हेंबर २०१९ ला तर ३ चीनी नागरिक २३ जानेवारीला चीनवरून दिल्लीला आले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील पहाडगंज येथून उदयपूर आणि त्यानंतर २३ मार्चला जयपूरमधील गेस्ट हाऊसवर हे चीनी नागरिक आले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना येथून जाता आले नाही. चीनमधील गोनेक्सी, शेनडांग, हेनन शहरातील हे लोक असल्याची माहिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.