ETV Bharat / bharat

बालाकोट दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय; 'जैश'च्या ४०-५० दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू - बालाकोट पुन्हा सक्रिय

एअर स्ट्राईक केल्यापासून भारताच्या गुप्तचर यंत्रणा या तांत्रिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून बालाकोटवर लक्ष ठेऊन होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तब्बल चाळीस ते पन्नास दहशतवादी सध्या तिथे प्रशिक्षण घेत आहेत.

Balakot reactivated
author img

By

Published : Oct 14, 2019, 5:51 PM IST

नवी दिल्ली : भारतीय हवाई सेनेने केलेल्या 'एअर स्ट्राईक'ला वर्षही पूर्ण झाले नाही, तेवढ्यात पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तब्बल चाळीस ते पन्नास दहशतवादी सध्या तिथे प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये काही आत्मघातकी दहशतवाद्यांचाही (सुसाईड बॉम्बर्स) समावेश आहे.

एअर स्ट्राईक केल्यापासून भारताच्या गुप्तचर यंत्रणा या तांत्रिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून बालाकोटवर लक्ष ठेऊन होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, बालाकोटमध्ये प्रशिक्षण घेतलेले काही दहशतवादी हे काश्मीरकडे पाठवण्यात आले आहेत. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर सहा महिन्यापर्यंत हे दहशतवादी तळ बंद होते.
गेल्या महिन्यातच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जाहीर केले होते, पाकिस्तान बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात आहे. यावर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने बालाकोटवर एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते.

हेही वाचा : मेक इन इंडियांतर्गत बनवल्या पहिल्या स्वदेशी स्नायपर रायफल

Intro:Body:

45-50 terrorists, including suicide bombers, training at JeM Balakot facility in Pakistan

Balakot air strike, JeM Balakot facility, Balakot terrorists, बालाकोट दहशतवादी तळ, जैश-ए-मोहम्मद, बालाकोट पुन्हा सक्रिय, Balakot reactivated

बालाकोट दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय; 'जैश'च्या ४०-५० दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरु

एअर स्ट्राईक केल्यापासून भारताच्या गुप्तचर यंत्रणा या तांत्रिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून बालाकोटवर लक्ष ठेऊन होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तब्बल चाळीस ते पन्नास दहशतवादी सध्या तिथे प्रशिक्षण घेत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय हवाई सेनेने केलेल्या 'एअर स्ट्राईक'ला वर्षही पूर्ण झाले नाही, तेवढ्यात पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तब्बल चाळीस ते पन्नास दहशतवादी सध्या तिथे प्रशिक्षण घेत आहेत. यांमध्ये काही आत्मघातकी दहशतवाद्यांचाही (सुसाईड बॉम्बर्स) समावेश आहे.

एअर स्ट्राईक केल्यापासून भारताच्या गुप्तचर यंत्रणा या तांत्रिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून बालाकोटवर लक्ष ठेऊन होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, बालाकोटमध्ये प्रशिक्षण घेतलेले काही दहशतवादी हे काश्मीरकडे पाठवण्यात आले आहेत. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर सहा महिन्यापर्यंत हे दहशतवादी तळ बंद होते. गेल्या महिन्यातच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जाहीर केले होते की पाकिस्तान बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात आहे.

यावर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने बालाकोटवर एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.