हैदराबाद - काल देशात ४४ हजार ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५२० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ८७ लाख ७३ हजार ४७९ इतकी आहे. तर १ लाख २९ हजार १८८ जाणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ४ लाख ८० हजार ७१९ असून ८१ लाख ६३ हजार ५७२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
मुंबई - मुंबईत काल ७२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६९ वरून २४३ दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
केरळ - राज्यात काल ६ हजार ३५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ६ हजार ७९३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच, २६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ७६ हजार ९२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर एकूण ४ लाख ४१ हजार ५२३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांनी आपल्या निवेदनात दिली.
तेलंगणा - राज्यात काल १ हजार ५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १ हजार ७३६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे, आता राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही २ लाख ५६ हजार इतकी झाली आहे.
गुजरात - अहमदाबाद जिल्ह्यात काल २१५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे, आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ४५ हजार १२४ झाली आहे. तर, काल २ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोना मृत्यूंची संख्या ही १ हजार ९४९ झाली आहे.
हेही वाचा - 'भारत-पाकिस्तानने चर्चा करून सीमेवरील रक्तपात थांबवावा'