चंदीगड - बर्नाला जिल्ह्यात एका चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोळा वर्षीय आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारचा आहे. मुलीला त्याच्या घरी नेऊन अत्याचार करण्यात आला. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाल न्यायालयात आरोपीवर खटला चालणार आहे.