ETV Bharat / bharat

थानागाजी-अलवार लैंगिक अत्याचारातील आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप - थानागाजी-अलवार लैंगिक अत्याचार अपडेट

२६ एप्रिल २०१९ला थानागाजी-अलवार बायपासच्याकडेला एका निर्जनस्थळी आरोपींनी पीडितेवर तिच्या पतीसमोर सामुहिक लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने आज आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

Thanagazi-Alwar gangrape case
थानागाजी-अलवार लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Oct 6, 2020, 6:31 PM IST

जयपूर - मागील वर्षी थानागाजी-अलवारमध्ये एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी अलवारच्या विशेष न्यायालयाने चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर पाचव्या आरोपीला न्यायालयाने आयटी अ‌ॅक्टच्या अंतर्गत पाच वर्षांचा तुरुंगवास दिला आहे.

हंसराज गुर्जर, अशोक गुर्जर, छोटेलाल गुर्जर आणि इंद्रराज गुर्जर अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर, मुकेश गुर्जर असे पाचव्या आरोपीचे नाव आहे. या सर्वांना भारतीय दंड संहिता, एसी/एसटी अ‌ॅक्ट आणि आयटी अ‌ॅक्टनुसार शिक्षा झाली आहे. आरोपींमधील हंसराज याच्यावर वारंवार अत्याचार केल्याचेही कलम लावण्यात आले आहे, अशी माहिती सरकारी वकील कुलदीप जैन यांनी दिली.

पाच आरोपींव्यतिरिक्त आणखीही एक अल्पवयीन आरोपी या प्रकरणी अटक आहे. त्याचा खटला ज्युवेनाईल न्यायालयात सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटकरून न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी कौतुकास पात्र आहेत. न्यायालयाच्या निकालामुळे अशा प्रकारचा आरोपींना योग्य ती शिक्षा मिळली आहे, असेही गेहलोत म्हणाले.

२६ एप्रिल २०१९ला थानागाजी-अलवार बायपासच्याकडेला एका निर्जनस्थळी आरोपींनी पीडितेवर तिच्या पतीसमोर सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. आरोपींनी पीडितेकडील दागिने आणि पैसे घेऊन तिचा व्हिडिओदेखील केली होता. गेल्या वर्षी २मे ला या प्रकरणी एफआयआर दाखल झाली होती. या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे या प्रकरणाचा वेगात तपास केला गेला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.