ETV Bharat / bharat

भारत-नेपाळ सीमेजवळ चकमक; चार माओवादी ठार... - भारत-नेपाळ सीमा चकमक माओवादी ठार

शुक्रवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास, वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाजवळ ही चकमक झाली. याठिकाणी माओवादी लपले असल्याची माहिती एसएसबीला मिळाली होती. त्यामुळे त्याठिकाणी शोधमोहीम सुरू असताना माओवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला, तर चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले...

4 Maoists killed encounter near Indo-Nepal border in Bihar
भारत-नेपाळ सीमेजवळ चकमक; चार माओवादी ठार...
author img

By

Published : Jul 10, 2020, 7:28 PM IST

पाटणा : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये लष्कर आणि माओवाद्यांदरम्यान चकमक झाली. यामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच, माओवाद्यांच्या लपण्याच्या जागेवरुन काही हत्यारे, आणि आयईडी जप्त करण्यात आले आहे.

सशस्त्र सेना बलाचे (एसएसबी) पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास, वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाजवळ ही चकमक झाली. याठिकाणी माओवादी लपले असल्याची माहिती एसएसबीला मिळाली होती. त्यामुळे त्याठिकाणी शोधमोहीम सुरू असताना माओवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला, तर चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

भारत-नेपाळ सीमेजवळ चकमक; चार माओवादी ठार...

कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांच्या या गटाचा प्रमुख राम बाबू साहनी उर्फ राजन पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, उपप्रमुख बिपुल आणि त्याचे तीन साथीदार यावेळी मारले गेले. साहनीला शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

यावेळी जप्त करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये एक एके-५६ रायफल, तीन एसएलआर, एक पॉईंट थ्री नॉट थ्री रायफल आणि आयईडीचा समावेश आहे. तसेच, या चकमकीमध्ये जखमी झालेला ऋतुराज याची प्रकृतीही सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा : गुजरात: कोरोना 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर व्यापाऱ्यानं रेल्वेसमोर उडी मारून संपवलं जीवन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.