मंडला - मध्य प्रदेशातील मंडला येथील राष्ट्रीय महामार्ग 30 जबलपूर रोडवर गुरुवारी पिकअप वाहन आणि मिनी ट्रकच्या अपघातात चार जण ठार झाले. यात पिकअप वाहनातून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा आणि ट्रकमधून प्रवास करणार्या एका व्यक्तीचा समावेश आहे. मंडलाचे पोलीस अधीक्षक दीपक शुक्ला यांनी ही माहिती दिली.
सध्या पोलीस अपघातस्थळी उपस्थित असून पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.
सोमवारी अशाच एका घटनेत मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एका चारचाकी आणि तीन मोटारसायकलींच्या धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. बामीठा पोलीस स्टेशन परिसरातील चंद्रनगरजवळील पन्ना रोड येथे ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांबद्दल संवेदना व्यक्त केली. तसेच, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना तातडीने मदत करावी, असे ते म्हणाले.