नवी दिल्ली - कोरोना संकटाचा सामना करत असतानाच चक्रीवादळ आणि भूकंप अशी संकट येत आहेत. बुधवारी सकाळी 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने भारत-बांगलादेश सीमा हादरली. मात्र, कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळी 7.10 वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 55 किमी खोल आणि सोहरापासून 82 कि.मी. दक्षिणपूर्व येथे होता, अशी माहिती प्रादेशिक भूकंपाच्या केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हा भूकंप मेघालयातील लोकांना जाणवला. पण, कोठेही नुकसान झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना संकटामुळे देशातील पर्यटनाचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पर्यटन ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या सर्व आव्हानांशी लढत असतानाच देशातील नागरिकांना भूंकप आणि चक्रीवादळाचा समाना करावा लागत आहे.