मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या हाहाकारामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. या काळात ब्राझीलमध्ये एका जहाजावर ३१२ भारतीय नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. या नागरिकांनी भारत सरकारला त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे.
गेल्या २० मार्चपासून हे भारतीय ब्राझील येथील सॅनतोझ इथल्या एका क्रुज जहाजावर अडकून पडले आहेत. लॉकडाऊन वाढल्यामुळे या जहाजावर असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे, या जहाजावरील योगेश पवार यांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून भारत सरकारने त्वरित जहाजावरील सर्व भारतीय नागरिकांना मायदेशात आण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे.