चाईबासा - झारखंडमधील कस्तुरबा गांधी कन्या शाळेतील तब्बल ३०० विद्यार्थ्यांना अन्नविषबाधा झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही बाब समोर आली. यातील ६० विद्यार्थिनींची स्थिती गंभीर आहे.
गंभीररीत्या आजारी असलेल्या ६० विद्यार्थिनींना शुक्रवारी सकाळी चाईबासा सरदार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे डॉक्टर जगन्नाथ हेमब्राम यांनी ही माहिती दिली. उरलेल्या विद्यार्थिनींवर शाळेतच उपचार सुरू आहेत. यासाठी २ वैद्यकीय पथके शाळेत पाठवण्यात आली आहेत.
या शाळेत एकूण ४०० विद्यार्थिनी शिकत आहेत. शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त अरावा राजकमल यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची माहिती दिली.