ETV Bharat / bharat

पाकिस्तानात अडकलेले 300 भारतीय लवकरच परतणार; महाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश - पाकिस्तानमध्ये अडकले भारतीय नागरिक

लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये ३०० भारतीय नागरिक अडकले आहेत. यामध्ये काही महाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश असून केंद्र सरकार लवकरच त्यांना भारतात परत आणणार आहे. या नागरिकांच्या कुटुंबीयांनी त्यांना भारतात परत आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने त्यांना परत आणण्याची तयारी सुरू केली आहे.

Wagha Border
वाघा बॉर्डर
author img

By

Published : May 24, 2020, 3:23 PM IST

नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये अडकलेले 300 भारतीय नागरिक लवकरच भारतात परतणार आहेत.

पाकिस्तानात अडकलेले 300 भारतीय लवकरच येणार परत

मागच्या दोन महिन्यांपासून हे नागरिक पाकिस्तानमध्ये अडकलेले आहेत. यात जम्मू काश्मिरमधील विद्यार्थी, पंजाब, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांच्या कुटुंबियांनी त्यांना भारतात परत आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने त्यांना परत आणण्याची तयारी सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.