देवास- मोबाईल चोरी करणाऱ्या ३ आरोपींना कंजर डेरा येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १० हजार मोबाईल ज्यांची किंमत १५ कोटींपेक्षा जास्त आहे, जप्त करण्यात आले आहेत. देवास पोलिसांनी आणि आंध्रप्रदेश पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारावाई केली आहे. विशेष म्हणजे, या मोबाईल चोरी मागचा मास्टरमाईंड हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. राम गाढे असे त्याचे नाव आहे.
राम गाडेसह अंकित झांझा आणि रोहित झाला या दोघांना अटक झाली आहे. तीनही आरोपी विविध राज्यातून मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक सामानांची वाहतूक करणाऱ्या ट्रकांची लूट करायचे. त्यानंतर, चोरलेल्या मोबाईल्सचे आयएमईआय नंबर बदलून त्यांना काळ्याबाजारात विकायचे. पोलिसांना पुणे, आंध्र प्रदेश येथील चित्तुर जिल्हा आणि देवास येथील महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक सामानांची चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर देवास पोलीस आणि मध्यप्रदेश पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी टोंक खुर्द नजिक कंजर डेरा येथून आरोपींना अटक केली.
याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १० हजार मोबाईल जप्त केले आहेत. तसेच, आरोपींकडून दोन ट्रक, एक कार, आणि चार दुचाक्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा- स्वातंत्र्यलढ्यात भाजपा ब्रिटिशांच्या बाजूने होता, राहुल गांधींचा 'किसान की बात' कार्यक्रमात आरोप