ETV Bharat / bharat

रणजीत बच्चन यांच्या हत्येचे रहस्य उलगडले, पत्नीनेच रचला होता कट - रणजीत बच्चन हत्या प्रकरण

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

रणजीत बच्चन
रणजीत बच्चन
author img

By

Published : Feb 6, 2020, 8:30 PM IST

नवी दिल्ली - विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. रणजीत यांची हत्या त्यांची दुसरी पत्नी स्मृती हीने केल्याचे उघड झाले आहे. स्मृती हिचे एक दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होते. त्यामुळे रणजीत बच्चन हे प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे स्मृतीने प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याची माहिती आहे.

पत्नी स्मृती वर्मा ही एक सरकारी कर्मचारी आहे. हत्येत सामिल असलेले स्मृती , देवेंद्र आणि संजीत गौतम यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर शूटर जितेंद्र अद्याप फरार आहे. देवेंद्र आणि स्मृती या दोघांचे एकमेंकावर प्रेम होते. मात्र, रणजीत स्मृतीला घटस्फोट देत नसल्याने त्यांना लग्न करता येत नव्हते. हे प्रकरण 2016 पासून न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यामुळे दोघांनी रणजीत यांना ठार मारण्याचे ठरवल्याचे पोलिसांनी सांगितले.

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गेल्या रविवारी राजधानी लखनौमधील हजरतगंज येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रणजीत बच्चन रविवारी सकाळी ६.३० वाजता लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. यावेळी दुचाकीस्वारांनी त्यांना गोळ्या घातल्या. डोक्यात गोळी लागल्यानं रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा - https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/hindu-mahasabha-president-ranjit-bachchan-shot-dead/mh20200202100633805

Intro:Body:

रणजीत बच्चन यांच्या हत्येचे रहस्य उलगडले, पत्नीनेच रचला होता कट

नवी दिल्ली -  विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. रणजीत यांची हत्या त्यांची दुसरी पत्नी स्मृती हीने केल्याचे उघड झाले आहे. स्मृती हिचे एक दुसऱया व्यक्तीवर प्रेम होते. त्यामुळे रणजीत बच्चन हे प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे स्मृतीने प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याची माहिती आहे.

पत्नी स्मृती वर्मा ही एक सरकारी कर्मचारी आहेत. हत्येत सामिल असलेले स्मृती , देवेंद्र आणि संजीत गौतम यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर शूटर जितेंद्र अद्याप फरार आहे. देवेंद्र आणि स्मृती या दोघांचे एकमेंकावर प्रेम होते. मात्र, रणजीत स्मृतीला घटस्फोट देत नसल्याने त्यांना लग्न करता येत नव्हते. हे प्रकरण 2016 पासून न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यामुळे दोघांनी रणजीत यांना ठार मारण्याचे ठरवल्याचे पोलिसांनी सांगितले.

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गेल्या रविवारी राजधानी लखनौमधील हजरतगंज येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रणजीत बच्चन रविवारी सकाळी ६.३० वाजता लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. यावेळी दुचाकीस्वारांनी त्यांना गोळ्या घातल्या. डोक्यात गोळी लागल्यानं रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यु झाला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.