लखनौ - उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 जण ठार झाले असून 1 गंभीर जखमी झाला आहे. लालगंज पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला असून जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून बिहारकडे जाणाऱ्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने कारला धडक दिल्याची माहिती आहे. जखमीला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून तेथे उपचार सुरू आहेत.
गुरवारी रात्री उशिरा हा रस्ता अपघात झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा अधिकारी सुशील कुमार पटेल आणि पोलीस अधीक्षक धरमवीर सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.