शिमला - देशभरामध्ये 24 मार्चला 21 दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्याआधी हिमाचल प्रदेशात गेलेले 240 पर्यटक तेथेच अडकून पडले आहेत. यामध्ये 100 भारतीय तर 140 परदेशी पर्यटक आहेत. सर्व वाहतूक ठप्प झाल्याने त्यांना माघारी येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. राज्य सरकारने विविध भागात असलेल्या नागरिकांची माहिती जाहीर केली आहे.
सर्वात जास्त पर्यटक कुलु आणि कांग्रा खोऱ्यात अडकून पडले आहेत. आता 14 एप्रिलपर्यंत त्यांना येता येणार नाही. देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आत्तापर्यंत 900पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण देशामध्ये आढळून आले आहेत. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे देशभरात आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.