ETV Bharat / bharat

तेलंगाणामधील तब्बल २३ पत्रकार रविवारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह.. - तेलंगाणा पत्रकार कोविड-१९

मिळालेल्या माहितीनुसार, १४० पत्रकारांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामधील २३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

23 journalists test positive for COVID-19 in Telangana
तेलंगाणामधील तब्बल २३ पत्रकार रविवारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह..
author img

By

Published : Jun 15, 2020, 4:23 AM IST

हैदराबाद - रविवारी तेलंगाणामधील तब्बल २३ पत्रकारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, राज्यात आतापर्यंत एकूण ६० पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे, तसेच एका पत्रकाराचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, १४० पत्रकारांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामधील २३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, रविवारी तेलंगाणामध्ये २३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, तीन लोकांचा कोरोनामुळे बळी गेला. यानंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,९७४वर पोहोचली असून, त्यांपैकी २,४१२ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर, आतापर्यंत एकूण १८५ लोकांचा मृत्यू झाला असून, २,३७७ लोकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

हेही वाचा : केरळनंतर आता छत्तीसगडमध्ये तीन हत्तींचा मृत्यू, अधिकाऱ्यांसह वनरक्षक निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.