ETV Bharat / bharat

ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर २२ गुन्हे दाखल, लाल किल्ल्याबाहेर कडेकोट सुरक्षा

दिल्लीतील अनेक ठिकाणी आज वाहतूक वळवण्यात आली असून आयटीओ या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लाल किल्ला आणि जामा मशीद मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली असून अनेक भागातील इंटरेट सेवा काही काळासाठी बंद ठेवली आहे.

ट्रॅक्टर मार्च
ट्रॅक्टर मार्च
author img

By

Published : Jan 27, 2021, 10:52 AM IST

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. लाल किल्ल्यावर आंदोलकांनी ताबा घेतला होता, सोबतच अनेक ठिकाणी सुरक्षा कवच तोडग मालमत्तेचे उल्लंघन केले तसेच पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी आता दिल्ली पोलिासांनी २२ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच लाल किल्ल्याबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला आहे.

सुमारे दिडशे पोलीस कर्मचारी जखमी -

एफआयआर
एफआयआर

दिल्लीतील अनेक ठिकाणी आज वाहतूक वळवण्यात आली असून आयटीओ या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लाल किल्ला आणि जामा मशीद मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली असून अनेक भागातील इंटरेट सेवा काही काळासाठी बंद ठेवली आहे. कालच्या हिंसाचारात आत्तापर्यंत दिडशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ४१ पोलीस लाल किल्ल्यावर, ३४ पूर्व दिल्ली भागात, ३० द्वारका जिल्ह्यात, २७ पश्चिम दिल्ली, १२ आउटर नॉर्थ आणि पाच पोलीस शाहदरा जिल्ह्यात जखमी झाले आहेत. दोन पोलिसांची प्रकृती गंभीर असून किरकोळ जखमी झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दंगल, लुटमार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल -

दंगल, लुटमार करणे, पोलिसांची बंदुका हिसकाऊन घेणे, पोलिसांवर हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसा या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर काल लाल किल्ल्यावर ताबा घेतल्यानंतर रात्री उशीरा अनेक शेतकरी बाहेर निघून गेले होते. मात्र, सुमारे १०० शेतकरी आतच राहिले होते. त्यांना दिल्ली पोलिसांनी शीशगंज येथील गुरुद्वाऱ्यात रात्री ठेवले होते. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांची ओळख पटवत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.