ETV Bharat / bharat

आसाममधील पुराचा वन्यजीवांनाही फटका; वेगवेगळ्या 208 वन्यप्राण्यांचा मृत्यू - काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे तेथील वन्यजीवांना सर्वाधिक फटका बसला आहे.

आसाममधील पुराचा वन्यजीवांनाही फटाका
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:48 PM IST

गुवाहाटी - आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे निम्म्याहून अधिक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. राज्यातील २८ पैकी १८ जिल्हे पुराने प्रभावित झाले असून तब्बल 26 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर वन्यजीवांवर देखील याचा परिणाम झाला आहे.

आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे तेथील वन्यजीवांना सर्वाधिक फटका बसला आहे. आसाममधील लोकप्रिय काझीरंगा राष्ट्रीय उद्यान 50 टक्के पाण्याखाली गेले आहे. पुरांमुळे इथल्या प्राणिजगतावर बराच परिणाम झाला आहे. तब्बल 208 वन्यजीवांचा यात मृत्यू झाला असून यामध्ये 18 गेंडे, एक हत्ती, 167 हरीण, 18 डुक्कर यांचा समावेश आहे.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आसाम राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून, जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे या अभयारण्यात सापडतात. ४३० चौरस कि.मी. एवढे मोठे हे अभयारण्य आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील सुमारे १५२ वर्ग कि.मी. भाग या क्षेत्राला जोडण्यात आलेला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.